जेवण बनवत असतानाच महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; क्षणातच होत्याचं नव्हत झालं पहा सविस्तर.
आपण पाहतो कि ग्रामीण भागामध्ये जास्त करून शेणामातीचे घर असतात किंवा काही जुनी घरे असतात जे पडकळीला आलेले असतात. या अश्या प्रकारचे जुने घर हि जीवघेणी असू शकतात असाच प्रत्यय सदरील बातमीतून आपल्याला येईल. या बातमी मध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत असतात. मोडकळीस आलेल्या ठिकाणी लोक राहत आहेत.
या पावसाळ्यात आपल घर तग धरेल का? हे पाहणं फार महत्त्वाचे आहे .आपल्या सोबत एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. जर बांधकाम हे जुने असेल तर अतिवृष्टीमुळे हे जुने बांधकाम तग धरत नाहीत, पण पहिले आहे कि पावसाने बर्यच जणांचे घर पडली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगावात अशीच एक घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील अरुणा आरसोड ह्या रात्रीच्या सुमारास या जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक घरात होत्या, अचानक घराचं माळवद कोसळल.
थेट अरुणाताई यांच्या डोक्यावर माळवद पडल, आणि त्या मातीच्या ढिगाऱ्या खाली दबल्या गेल्या. त्यामुळे ढिगाऱ्याखाली जखमी होऊन गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अरुणाताई यांचे पती शेतातून आल्यानंतर त्यांनी घरातील हा धक्कादायक प्रकार पाहिला, व याबाबतची माहिती त्यांनी गावकऱ्यांना देताच अख्ख गाव मदतीसाठी धावल.
मातीच्या ढिगाऱ्याखालून दबलेल्या अरुणाताईंना बाहेर काढण्यात आलं ,आणि दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल. पोलीस प्रशासन महसूल विभागाला कळवण्यात आलं. अरुणाताई यांचा मृतदेह गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. अरुणाताई यांच्या पाठी मागे दोन मुलं ,एक मुलगी ,पती असा संसार आहे. घडलेल्या घटना मुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे .