मोठी राजकीय बातमी ; दसरा मेळावा शिंदे गट घेणार ?
राजकारणातली सर्वात मोठी बातमी हाती येते. शिवसेनेची परंपरा राहिलेल्या दसर्या मेळाव्याबद्दलची महत्वाची बातमी आहे. सध्या शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत. एक गट हा एकनाथ शिंदे यांचा आणि दुसरा गट ठाकरे यांचा आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते, नेते मंडळी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत, आमचं हिंदुत्व आहे ,असं म्हणतात त्यामुळे आमची शिवसेना खरी असाही दावा करतात. त्यामुळे खरे शिवसैनिक अजुनही संभ्रमात आहेत. आपण शिंदे गटात आहोत का आपण ठाकरे गटात आहोत. आपली विचारसरणी काय आहे, यावर त्याचा प्रत्येकाला विचार करावा लागतो, जेव्हा एखादा व्यक्ती शिवसैनिक होतो. तेव्हा त्याच्या हातात शिवबंधन बांधले जाते. या शिवबंधनाचा पावित्र्य हे पक्षासोबत एकनिष्ठ राहणे, पक्षाचं एकजुटीने काम करणे आहे. मात्र सध्या शिवसेनेमध्ये जे काही सुरू आहे ते सर्व महाराष्ट्र पाहत आहे.
त्याचबद्दलची मोठी बातमी आहे . शिवाजी पार्क वरती दसऱ्याच्या वेळी मोठा मेळावा आयोजित केला जातो. हा दसरा मेळावा अगदी बाळासाहेब यांच्यापासून राहिलेली परंपरा आहे. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. ठाकरे कुटुंब या ठिकाणी उपस्थित असतं. संपूर्ण महाराष्ट्राला शिवसैनिकांना ते संबोधित करतात. चालू घडामोडींवर त्याठिकाणी चर्चा केली जाते. काही निरोप पोहोचवले जातात तर पुढची आखणी देखील केली जाते. या सगळ्यात एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री यांच्या गटात रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना पालिकेने मात्र आता हात आखडता घेतला अशी माहिती मिळते. शिवसेनेचे प्रभावी नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा बंड केला होता त्यात उभी फूट पडली होती. हा संपूर्ण वाद न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. यावर न्यायालयाकडून ठोस काहीही निर्णय झालेला नाही.
शिवसेनेचा 50 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या दसरा मेळावा जाहीरपणे शिवतीर्थावरच घेणार असा विश्वास शिवसैनिकांना दिला होता. गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा जाहीर आयोजन करण्यात आलं होतं. कारण तेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता. गेल्या वर्षी तर प्रमुख पदाधिकारी उपस्थित शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. दसरा मेळावा हा देखील तितकाच थाटामाटात संपन्न होणार आहे. मात्र हाच मेळावा आता शिंदे गटाकडून करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाची निर्णयावर ते दावा केला जातो. शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिलेला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का अशी चर्चा सध्या रंगू लागली. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुढे काय होतं ? त्यामूळे येणारा दसरा मेळावा हा नेमका कोण घेणार हा प्रश्न आता सर्वसामान्य माणूस उपस्थित करत आहे.