” हम मर जायेंगे.. ” म्हणत प्रेयसीच्या घरासमोर जावून पहा प्रियकराने काय कारनामा केला.
” तेरे प्यार मे मर जायेंगे”, असे प्रेमी युगल म्हणत असतात मात्र ह्या प्रियकराने ते खर केले, त्याने घरच जीवं दिला पाहूयात हे प्रेम प्रकरण न नेमक काय आहे या तरुणाने एवढा टोकाच निर्णय घेतला.प्रेमात लोक अनेकदा सगळ्या सीमा ओलांडतात. बऱ्याचदा या प्रेमाचा शेवट अतिशय भयानक आणि अनपेक्षित असतो. उत्तर प्रदेशमधून अशीच एक हादरवणारी घटना समोर आली आहे.यात प्रेमात एका 20 वर्षीय तरुणाने प्रेयसीच्या घरासमोर जात विष प्राशन करून आत्महत्या केली.
मृत्यूपूर्वी शुभमने ‘तेरे बिना मरजावां…’ या गाण्यावर इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. रीलमध्ये त्याने आपला आणि प्रेयसीचा फोटोही लावला होता. शुभमने विष प्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले.त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. प्रेयसीचे कुटुंबीय त्यााला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते, असं मृताच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. ही घटना यूपीमधील झाशीची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम वर्मा उर्फ गोलू हा झाशीतील बडागाव गेट येथील मास्टर कॉलनीत राहत होता.तो एका मेडिकल स्टोअरमध्ये कामाला होता. मिशन कंपाउंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. बुधवारी दुपारी शुभमने इन्स्टाग्रामवर रील अपलोड केली. यामध्ये शुभमने स्वतःचा आणि प्रेयसीचा फोटो टाकला होता.‘तेरे बिना मरजावां…’ हे गाणं रीलमध्ये लावण्यात आलं होतं. यानंतर तो दुचाकीवरून मिशन कंपाउंडमध्ये गेला आणि तिथे प्रेयसीच्या घराजवळ जाऊन विष प्राशन केलं.
शुभमचा मोठा भाऊ उमेशच्या म्हणण्यानुसार, “प्रेयसीच्या वडिलांनी फोन करून शुभमच्या मित्राला त्याने विष प्राशन केल्याची माहिती दिली. यानंतर मित्र त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले.त्याची दुचाकी तिथे पार्क केलेली आढळून आली. फोनही तिथेच होता. आजूबाजूला शोध घेतला असता, शुभम जमिनीवर पडलेला आढळून आला. त्याच्या खिशात विष आढळलं.उमेश म्हणाला, “आम्हाला घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर सर्वजण शुभमला घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले.डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. त्यामुळे शुभमचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. .” शुभमचे वडील आणि भाऊ उमेश यांनी प्रेयसीच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे.मुलीचे कुटुंबीय शुभमला अनेकदा धमकी देत होते, असा त्यांचा आरोप आहे. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं मत आहे.