” 2 नंबरचे धंदे बंद केल्याने मला 5 लाखाचे नुकसान” स. पो. निरीक्षकाचे आरोप त्यामुळे पो.ह. चे टोकाचे पाऊल पोलीस दलात खळबळ.
पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लीहून ठेवली होती, ही सुसाईड नोट त्यांनी पत्रकार व हितचिंतक यांना व्हाट्सअप्प द्व्यारे पाठवली असुन सदर चिठ्ठी मधे आघाव यांनी म्हटले आहे की, मी पोहे. काँ २५९ भाऊसाहेब दगडु आघाव नेमनुक पोलीस मुख्यालय अहमदनगर. सत्य प्रतीशिवर लीहून देतो की मी श्री अजीत दादा पवार यांचे अकोला दौरा बंदोबस्ता करीता गेलो असता, येथे मला सपोनी साबळे राजुर पो.स्टे भेटले व म्हणाले की, तुम्ही शेंडी Op ला असताना सर्व दोन नं धंदे बंद केल्यामुळे माझे ५ लाखाचे नुकसान झाले.
मी ASI निमसे याना हाताशी धरून व म पो.कॉ राऊत यांच्या मदतीने तुमचे विरुद्द गुन्हा दाखल केला तेंव्हापासून पैसे चालु झाले आहे. तुम्ही १० लाख रुपये द्या तुम्हाला मी या गुन्हायातुन सोडवतो. तेव्हा मी त्याना म्हणालो १० लाख रुपये कशाचे तेव्हा ते म्हणाले की, माझे ५ लाख हा गुन्हा दाखल करण्या साठी AS I निमसे यांना ३ लाख व राऊत यांनी मपो कॉ राऊत हिस गुन्हा मागे घेण्याशी तयार केले म्हणुन २ लाख असे १० लाख व तुमची विभागीय चौकशी चालु आहे त्यातुन बाहेर काढणे साठी.
डी इ काम पहानारे शिवाजी फुंदे भाऊसो यांना एक लाख रुपये द्या. त्यावर मी म्हणालो माझे कडे इतके पैसे नाहीत व मि निघुन गेलो नंतर माझा चौकशी अहवाल आला. मला फुंदे सो यांनी बोलावून सांगीतले तुमचा चौकशी अहवाल आला आहे. मी तुम्हाला यातुन सुखरूप बाहेर काढतो, तुम्ही साबळे सो यांनी सांगितले प्रमाणे करून टाका. तेव्हा मी त्यांना म्हणालो माझ्याकडे एव्हडे पैसे नाहीत. मग ते म्हणाले मग भोगा.
असे म्हणल्यावर मी निघुन गेलो. नंतर मला SP सो यांनी वॉर करीता बोलावले. तेव्हा मी सर्व काही मा s p सो यांना सांगीतले. तेव्दा त्यानी काही एक प्रतिक्रिया दिली नाही त्या मुळे मी पुर्णपणे हाताश झालेलो आहे. आणि आज रोजी स्वःताला संपवत आहे. माझ्या मरणास सपोनी साबळे सो ASI निमसे मपोकॉ राऊत व शिवाजी फुंदे हे जबाबदार आहेत.
आपला विश्वासु.
अशा प्रकारची सुसाईड नोट प्राप्त झाल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली असुन मयत हवालदार आघाव यांचे मृत्युस कारणीभुत असलेल्यांना अटक झाले शिवाय व त्यांचे मृत्युस कारणीभूत असणारावर कारवाई केल्या शिवाया मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी सांगीतले असुन पोलीस प्रशासन काय भुमीका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे . .