‘कपडे काढून पूजा कर, वडिलांचं कर्ज माफ होईल’ आणि पुढे नको तेच घडलं, नग्न पूजेचा VIDEO झाला व्हायरल…
जे अंधश्रद्धेच्या आहारी गेले आहेत. ज्यासाठी ते काहीही करण्याची तयारी दाखवतात. परंतू याचा परिणाम नेहमीच वाईट होतो, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कर्नाटकातून एक असंच विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे धक्कादायक आहे.
वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन मुलाला कपडे उतरवून नग्न पूजा करण्यास भाग पाडले, ज्यानंतर त्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला.कर्नाटकात एका मुलाला कपड्यांशिवाय पूजा करण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे
या अल्पवयीन मुलाचे वय 16 वर्षे आहे. या मुलाला बळजबरी केली गेली होती की, तुला तुमच्या वडिलांवरील कर्ज लवकर फेडावे असे वाटत असेल, तर त्याने नग्न होऊन पूजा करावी. ज्यानंतर या मुलाने देखील त्याला जे जे सांगितलं गेलं, तसं केलं देखील. परंतू हे सगळं करत असताना त्या मुलाचा व्हिडीओ काढला गेला
पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तीन आरोपींना अटक देखील केली. अधिकाऱ्यांनी या आरोपींची ओळख शरणप्पा तलवारा, विरुपनगौडा आणि शरणप्पा ओजानहल्ली अशी केली आहे, ते सर्व कोप्पलचे रहिवासी आहेत आणि ते पीडिताच्या ओळखीचे आहेत.