धक्कादायक : एका पत्रकाराने त्याच्या शिक्षिका पत्नीसोबत पहा हे काय केले.
तो पत्रकार आहे आणि तो पत्रकार असून देखील त्यांना आपल्या शिक्षिका असणाऱ्या पत्नीसोबत अत्यंत वाईट केलं. त्यांना एकदा नाही तर तिसऱ्यांदा त्याच्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिसऱ्या वेळेसही त्याची बायको यातून वाचलेली आहे.
आपल्या बायको वरती हल्ला करून त्या बायकोला जीवे मारण्याचा प्रयत्न हा पती वारंवार करत होता. या पद्धतीने या पतीनं आपल्या पत्नीला संपवण्यासाठी काही हल्लेखोरांना सुपारी दिली होती. आणि आज हल्लेखोरांनी ही शिक्षिका बस ची वाट पाहत उभी असतानाच चाकूने हल्ला केला पाहूयात बातमी सविस्तर.
यवतमाळ जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी यवतमाळ येथे धक्कादायक प्रकार घडला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना संबोधलं जातं मात्र पत्नीवरील चाकू हल्ल्याचा मास्टर माईंड पत्रकार पतीचं निघाला आहे. जिल्हा परिषदेच्या एका शिक्षिकावरती चाकू हल्ला झाला. या हल्ल्याचा मास्टर माइंड जखमी असलेल्या शिक्षिकेचा पतीचं पुढे आलेला आहे.
यामध्ये त्याला अटक करण्यात आलेले आहे. आरोपी पती हा नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाच्या चंद्रपूर येथील प्रतिनिधी आहे. जितेंद्र मशारकर असे मास्टर माईंड पतीचे नाव असून याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात आतापर्यंत पतीसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या वैशाली या शाळा सुटल्यानंतर चंद्रपूर येथे परत जात असताना बोलेरो फाटावरती बसची वाट पाहत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला त्याच्या कानाजवळ जबर दुखापत झाली.