खारे कर्जुने येथील जुनी विहिर खचली; त्यामुळे होऊ शकते मोठी दुर्घटना. ग्रामस्थांची नूतनीकरणाची मागणी.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ओढे, नद्या, नाले यांना पूर येत असतो, अनेक पूल तुटतात, खड्डे पडतात. मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर भीषण अपघातही होतात. ग्रामीण भागात अतिवृष्टी मुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. आणि त्यामुळे शेतकरी हा हवालदिल होत असतो. याच पावसाळ्यात जुन्या इमारती, वाडे हे जीर्ण झाल्यामुळे पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा वित्त हानी होते.
अहमदनगर जिल्हा तसा दुष्काळी म्हणून पहिला जातो. मात्र काही प्रमाणात या ठिकाणीही जोरदार पाऊस हजेरी लावतो. यंदाच्या वर्षी उशिरा का होईना पाऊस आला. त्यामुळे तळे, नद्या, नाले, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. नगर तालुक्यातील खारे कर्जुने ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील एक जुनी विहीर आहे. या विहिरीचा अनेक वर्षापासून गावकरी वापर करत होते. मात्र आता ही विहीर खूप जुनी झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही विहीर अचानक खचली आहे.
विहीर अचानक खचल्यामुळे त्या विहिरीजवळील रहिवासी असणाऱ्या दलित वस्तीला व ढवळे परिवाराला धोका निर्माण झाला आहे. अनेक गावकरी व शाळकरी मुले या ठिकाणाहून येत – जात असतात व दलित वस्ती मधील लहान मुले व भिल्ल वस्ती मधील लहान मुले याच विहीरीच्या परिसरात खेळत असतात त्या मुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हि विहीर जवळजवळ 55 वर्ष जुनी आहे. त्यामुळे अचानक एखादी अविपरीत घटना घडून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थ या विहिरीचे नूतनीकरणाची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत.