भाजपच्या ” या ” आमदाराचा भाऊ बेकायदेशीर जागेचा ताबा घेण्यासाठी JCB ने पाडतोय लोकांची घर आणि दुकानं.
सांगली जिल्ह्यामध्ये मिरज शहरात मध्यरात्री दुकाने, हॉटेल पाडण्यात आले आणि त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ब्रह्मानंद पडळकर याने बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्या असा नागरिकांनी आरोप केला आहे.
या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरचा भाऊ ब्रह्मानंद पडळकर याच्यासहित आणखी १०० जणांवर मिरज शहर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात रात्रीच्या अंधारात दुकान आणि हॉटेल जेसीबीचे साहाय्याने पाडण्यात आले या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
ब्रह्मानंद पडळकर हा सांगली जिल्हा परिषदेचा माजी सभापती असून बेकायदेशीर जमाव जमून मालमत्तेचे नुकसान तसेच बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण करणे, नागरिकांच्या जीविकास धोका निर्माण करणे याप्रमाणे 12 कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्याशेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर, पान शॉप अशा प्रकारे पाडण्यात आलेल्या मिळकती आहेत. मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने तसेच हजारो लोकांच्या सहाय्याने जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आला होता असा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. ब्रह्मानंद पडळकर हा आमदार गोपीचंद पडळकर याचा भाऊ आहे. त्यामुळे या प्रकरणाला नक्कीच वेगळे वळण येऊ शकते. पोलिसांनी याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकर व 100 जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.