जरंडी ते निंबायतीगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.१२…पंतप्रधान सडक योजनेत तयार करण्यात आलेल्या जरंडी ते निंबायतीगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून या रस्त्यावरून वाहनधारकांना खड्डे चुकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
निंबायती गाव ते जरंडी या तीन की मी रस्त्याचे २०१० मध्ये पंतप्रधान सडक योजनेतुन काम पूर्ण करण्यात आले होते, परंतु तब्बल एक तपानंतरही या रस्त्याची डागडुजी अथवा दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे झाल्यामुळे दुचाकी वाहन धारकांना खड्डे चुकवितांना अपघाताला निमंत्रण द्यावे लागत आहे जरंडी पासून ते निंबायती गाव पर्यंत या रस्तावर नागमोडी वळणे आहे त्यात पुन्हा खड्डे त्यामुळे हा रस्ता अपघात मय झालेला आहे रस्त्यावर अद्यापही डागडुजी झालेली नसून या रस्त्यावरून निंबायती गाव,निंबयती,रामपुरा,न्हावी तांडा या चार गावांना हा रस्ता जोडणी करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक खड्ड्यामुळे बंद झालेली आहे या रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे….