पिकअप चोरी करून पळालेले दोन आरोपी पिकअपसह पोलिसांनी केले जेरबंद, जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.
जामखेड तालुका प्रतिनिधी,
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी येथील शेतकरी अमृता भगत (वय ४७) यांचा महिंद्रा बोलेरो कंपनीचे पांढरे रंगाचे पिकअप क्रमांक एम एच २५ पी. ३२०६ हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला असून ते चोरटे ते पिकअप घेऊन जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील जामखेड ते सौताडा रोडने गेल्याचे माहिती मिळाली त्यानुसार त्या पिकअपचा पाठलाग करून पिकअप व दोन आरोपी यांना जेरबंद करण्याची धडाकेबाज कामगिरी जामखेड पोलीसांनी केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती असे की उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ज्योतिबाचीवाडी येथील शेतकरी भीमा अमृता भगत यांचा महिंद्रा बोलेरो कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप अज्ञात चोरट्याने दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजीचे रात्री दहा ते दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजीचे सकाळी सहा वाजताचे दरम्यान फिर्यादीचे राहते घरासमोरून चोरून नेला आहे. अशी माहिती काल दि. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत सायंकाळचे सुमारास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भोसले यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांना फोनवर कळविले.
वरील वर्णनाचे चोरी गेलेली पिकअप जामखेडच्या दिशेने आलेली आहे तरी तुम्ही आपले हद्दीत त्याचा शोध घ्यावा अशी माहिती दिल्याने सपोनि बडे.यांनी पेट्रोलिंग करणारे पोलीस अंमलदार पोलीस नाईक अविनाश ढेरे ,पोलीस कॉ.विजय कोळी, आबासाहेब आवारे यांना तात्काळ माहिती दिली. या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील जामखेड ते सौताडा रोडने पिकअपचा पाठलाग करून साकत फाटा, जामखेड येथे गाडी आडवी लावुन पिकअप व दोन आरोपीं चोरट्याना जागेवर पकडले. त्यांना पोलीस स्टेशन येथे आणले असता, सदर आरोपीना त्यांचे नावे अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर, जि.बीड व आसाफ दस्तगीर शेख रा.रोहतवाडी, ता.पाटोदा जि.बीड अशी सांगितली आहेत.
अधिक सखोल चौकशी केली असता हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार आरोपी अतुल विक्रम वाघमारे रा.शिवाजीनगर,बीड यांचेवर भादवि कलम ३७९ (गेवराई पो.स्टे), भादवि कलम ३९४, (शिवाजीनगर,बीड पो.स्टे), भादवि कलम ३९५ (नगर तालुका पो.स्टे), भादवि कलम ३९४ (श्रीगोंदा पो.स्टे.), भादवि कलम ३९२ (शिरूर पो.स्टे.जि.बीड), दोन वेळा, भादवि कलम ३९५ (सातारा), भादवि कलम ३९५, (कोतवाली पो.स्टे.), भादवि कलम ३७८ (पाटेादा पो.स्टे), भादवि कलम ३९५ (सातारा), भादवि कलम ३७९ (फलटन), भादवि कलम ३९४ (गातेगाव पो.स्टे.लातुर), तर आसाफ दस्तगीर शेख रा.रोहतवाडी ,ता.पाटोदा जि.बीड याचेवर भादवि कलम ३७९ (वैराग पो.स्टे.पंढरपुर), भादवि कलम ३७९( फलटन ,सातारा), भादवि कलम ३७९ (शिवाजीनगर, बीड), भादवि कलम ३९४ (गातेगाव ,लातुर), भादवि कलम ३९४(पाथर्डी पो.स्टे.), भादवि कलम ३७९ (बीड तालुका पो.स्टे.), भादवि कलम ३९९(शिवाजीनगर, बीड), असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
काल दि. १९ रोजी केलेली कामगिरी ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस ना. अविनाश ढेरे, पोलीस कॉ. विजयकुमार कोळी, आबासाहेब आवारे, प्रकाश जाधव यांनी केली असुन आरोपी व वाहन हे पुढील कार्यवाहीकरीता वाशी पोलीस स्टेशनचे पोना.भोसले व पोकॉ.शेवाळे यांचे ताब्यात दिले आहे.