दुर्दैवी : दुधातून विषबाधा बहिण – भाऊ यांची प्राणज्योत मालवली, तर आईची प्रकृती गंभीर पहा सविस्तर बातमी.
विषारी औषध पिल्यामुळे डोंगरगाव ता.सिल्लोड येथील आईसह दोन मुलांवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलीचा गुरुवारी तर मुलाचा शनिवारी मृत्यू झाला सिल्लोड पोलीस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यू नोंद झाली आहे, विष कुणी पाजले, याचे गूढ असून तपास सुरू आहे
मुदस्सीका हारूण पठाण वय ९ वर्ष,आयान हारूण पठाण वय ७ असे मृत बहीण-भावाचे नाव आहे मत्यूशी झुंज देणाऱ्या आईचे नाव मोमीनबी हारूण पठाण वय ३५ असे आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ अगस्टला दुधातून विषारी औषधे पोटात गेल्याने मोमीनबी हारूण पठाण, मुदस्सीका हारूण पठाण, आयान हारूण पठाण बेशुद्ध पडले, हारूण पठाण यांनी पत्नी, दोन मुलांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते उपचार सुरू असताना मुदस्सीका, आयान यांचा मृत्यू झाला.
मोमीनबी यांच्यावर उपचार सुरू आहेत सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी डोंगरगाव येथे भेट दिली या तिघांना विषारी औषध कुणी पाजले याबाबत अद्याप उलगडा झाला नाही ,पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून चौकशी सुरू केली आहे