दुसरीसोबत संसार थाटायचा होता; म्हणून प्रियांकाची दिली सुपारी, महिला इंजिनियर सोबत पहा काय घडले.
पतीच्या विवाहबाह्य संबंधांमध्ये पत्नी ही अडसर ठरत होती म्हणून पतीच्या प्रियसीने आणि पतीने मिळून या पत्नीचा अत्यंत आणि क्रूरपणे खून केला आहे. या खुणासाठी मारेकरांना तीन लाख रुपये दिल्याचे देखील माहिती समोर येते आहे.. २९ वर्षांच्या महिलेची गेल्या आठवड्यात पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर हत्या झाली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये हत्या झालेल्या महिलेचा पती, त्याची प्रेयसी आणि प्रेयसीच्या बॉसचा समावेश आहे.
एकूण सहा जणांनी मिळून महिलेच्या हत्येची योजना आखली होती. अटकेत असलेल्या तिघांनी हत्येसाठी तीन जणांना ३ लाख रुपये दिले होते. प्रेयसी निकिता मटकर मानखुर्दमधील एका खासगी क्लासमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. तो क्लास प्रवीण घाडगे (४५) चालवतात. प्रियांकाची हत्या करून निकिताला देवव्रतसिंह सोबत राहायचं होतं. मटकर आणि रावत ,घाडगे यांच्याकडे गेले. त्यांनी प्रियांकाच्या हत्येसाठी मदत मागितली.
त्यांनी दोघांची ओळख बुलढाण्याच्या एका टोळीशी करून दिली. यानंतर प्रियंकाच्या खुनाचा कट रचला गेला. रावत यांनी ३ लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर टोळीतील तिघांनी पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर प्रियांकाची हत्या केली आणि बुलढाण्याला पळून गेले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. देवव्रतसिंहचे कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल तपासला. त्याच्या मोबाईलमध्ये मटकरसोबतचे फोटो आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी रावत आणि मटकर यांची स्वतंत्रपणे चौकशी केली. मटकरनं चौकशीत सत्य सांगितलं.
पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर १५ सप्टेंबरला रात्री १० च्या आसपास हत्या झाली होती. पनवेल पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज मागवलं. रात्रीची वेळ असल्यानं सीसीटीव्ही फुटेज फारसं स्पष्ट नव्हतं. त्यात हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. फुटेजमध्ये आरोपी प्रियांकाची वाट पाहताना दिसत होता. प्रियांका रेल्वे स्थानकातून बाहेर पडून रिक्षा पकडण्यास जात असताना आरोपीनं चाकूनं मागून हल्ला केला. त्यानं प्रियांकाचा गळा चिरला. हल्ल्याची योजना अंमलात आणणाऱ्या तिघांची नावं समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र अशा पद्धतीने राहणारे ज्या ठिकाणी खून झाला त्यामुळे परिसरामध्ये वातावरण खराब झालं होतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.