धक्कादायक : 5 मिनिटे उशिरा आला म्हणून पहा मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचे काय हाल केले. बातमी सविस्तर.

मन विचलित करणारी ही बातमी आहे. तुमचे पाल्य शाळेत जात असतील आणि त्यांना जर उशीर होत असेल तर त्यांना लवकर पाठवा. कारण ही बातमी वाचून तुमच्याही अंगावरती काटा येईल शिक्षा देणे हे विद्यार्थ्यांना चांगली सवय लागावे, शिस्त लागावी यासाठी असतं. मात्र ती शिक्षा देणं जीवावरच भेतेल की काय हा विचार करणे हे फार महत्त्वाच आहे.
कारण उत्तर प्रदेश मधील शामली या ठिकाणी आदर्श मंडी परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. जय जवान जय किसान इंटर कॉलेजमधील मुख्याध्यापकांनी आठवीच्या विद्यार्थ्याला इतके मारहाणी केली की तो पुन्हा उभा राहू शकला नाही. त्याचे चूक एवढीच होती की, तो फक्त पाच मिनिटे उशिरा शाळेत पोहोचला होता. काही दिवसांपूर्वी तो आजारी होता वडिलांनी आपल्या मुलावर उपचार केले आणि त्यानंतर थोडं बरं वाटल्यानंतर त्याला शाळेत सोडलं.
विद्यार्थी पाच मिनिटे उशिरा आला म्हणून व त्याने शिस्त मोडली म्हणून मुख्याध्यापकाने त्याला मारहाण केली. तर मुलाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले वडिलांनी मुलाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेलं. तिथे एक्स-रे काढला त्यावेळी सत्य समोर आल. मुलावर सध्या उपचार सुरू आहेत मुलाच्या दोन्हीही पायाला प्लास्टर आहे. पालकांनी मुख्याध्यापकावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या मुलाला इतकी मारहाण झाली आहे की मुलाच्या पायाची हाड तुटली आहेत. आणि त्यामुळे दोन्हीही पायाला फ्रॅक्चर झालं आहे. पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी आता आई-वडिल, नातेवाईक करत आहेत.