सुप्यातील या ” मोठ्या ” कंपनीने घेतला मोठा निर्णय, सुप्यात कधीच…
गेल्या काही दिवसापासून राजकारणात बरेच काही बदल झालेले आपण सगळ्यांनी पाहिलं आहेतच, त्यानंतर बऱ्याच बड्या बड्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत हे ताजे असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील सुपा MIDC मधील एका कंपनीने आपले बिऱ्हाड आवळून निघायची तयारी केली आहे. सुप्यातील ” तोशिबा ” कंपनी थायलंड गाठले आहे.
या कंपनीच्या म्हणणे आहे कि, सुप्यातील काही स्थानिक गुंड त्यांच्या कामात अडथला निर्माण करत असून खूप मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आहे आणि असे जर चालू राहिले तर आम्ही इथले काम बंद करू अशी जाहीर माहिती त्यांनी मुंबई येथील कार्यालयाला पाठवली असून नाशिक येथील एम आई डी सी च्या कार्यालयाचे लक्ष सुद्धा वेधले आहे.
आपल्या जवळच असणाऱ्या शहरातील औद्योगिक विकास पहिला असता आपले नगर मधील औद्योगिक विकास कुठेच नाही आणि अश्यातच येथे येणाऱ्या कंपन्यांना जर अश्या प्रकारे त्रास झाला तर आपला औद्योगिक विकास होणार कसा ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सुप्यातील काही स्थानिक गुंड कंपनीच्या कामात अडथला निर्माण करत असल्याने कंपनीने येथून जाण्याचे पर्याय उपलब्द आहेत असे बोलून दाखवले आहे. याबाबतची माहिती सर्पोलीस अधीक्षकांना दिली असून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तर पुढे पहायचे आहे कि यामध्ये उद्योगमंत्री सामंत तसेच अहमदनगर चे खासदार विखे काय करतील ?