” कुत्रा चिन्ह दिलं तरी निवडून येईल.” पहा बातमी सविस्तर.
राजकारणात कधी कोण काय वक्तव्य करेल याचा काही नियम नसतो. सध्या राजकीय वर्तुळामध्ये दसरा मेळावा वरून मोठा वादंग निर्माण झाला होता, मात्र त्यावर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पडदा पडला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेतील त्यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर देखील होऊ शकतो. तर दुसरीकडे शिवसेनेतीलच शिंदे गट बीकेसी वरती दसरा मेळावा घेणार अशी घोषणा करण्यात आली.
हे सांगत असतानाच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपली मत मांडली. ते म्हणाले उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी आमच्या अगोदर अर्ज केला होता. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान त्यांना मिळाला आहे, मात्र आमचाही दसरा मेळावा मुंबईतला बीकेसी वर होणार आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज घुमणार आहे. पाच तारखेला दसरा मेळावा होईल.
ती इतिहासात न होणारी सभा राहणार आहे तसेच अब्दुल सत्तार पुढे म्हणाले कि, आम्ही सरकार सोडून बाहेर गेलो तेव्हा मुंबईत येऊन दाखवा असं शिवसेनेने म्हटल होता. तेव्हा शिंदे साहेब म्हणत होते मी या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. मी एकटा जातो आणि राज्यपालांची भेट घेतो. एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्यपालापुढे ठेवला होता. असे यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले शिवसेना शिंदे साहेबांचीच आहे.
धनुष्यबान ही निशाणी त्यांनाच मिळेल असेही ते म्हणाले. आणि पुढे उपरोक्तपणे अब्दुल सत्तार म्हणाले की, “मला कुत्रा निशाणी जरी मिळाली तरी मी निवडून येईल.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान शिंदे गटातील अनेक आमदारांनी, खासदारांनी आणि मंत्र्यांनी दसरा मेळाव्याबद्दल आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यभरातून मुंबईतील मेळाव्याला दहा लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास सर्वजण व्यक्त करतात.