भावाच्या हिंमतीला तोडच नाही ! मगरीच्या पाठीवर बसून चालवतोय बाईक, व्हिडियो होतोय व्हायरल.
तुम्ही सोशल मीडिया वरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत असाल, अनेक गोष्टी बघत असाल मात्र हा व्हिडिओ तुम्हाला आवाक करणारा आहे, कारण हा व्हिडिओ चक्क बाईक वरती मगरीला घेऊन जाण्याचा आहे. साधी एखादी मुंगी किंवा पाल निघाली तर अनेक जण घाबरतात मात्र हा पट्ट्या आपल्या दुचाकी वरती मगरला घेऊन चाललाय, त्यामुळे हा व्हिडिओ पाहण्याचा धाडस अनेक जण करतात मात्र या व्हिडिओ तुला घेऊन कुठे चालला काय चालला याबद्दल काहीही कल्पना नाहीये.
या व्हडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणानं मगरीला बाईकवर झोपवलंय. अन् स्वत: मगरीच्या पाठीवर बसून बाईक चालवतोय. हे दृश्य शेजारून जाणाऱ्या काही गाडीवाल्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. अन् आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४० लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून १ लाख ४० हजारांपेक्षा अधिकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काही जणांच्या मते ही मगर पाळीव आहे तर काहींच्या मते ती मेलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? ही मगर जिवंत आहे की मृत?मगर हा सर्वात खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे दात इतके अणकूचीदार असतात की एखाद्या मशीनप्रमाणे तो आपल्या भक्ष्याचे दोन तुकडे करतो. त्यामुळे मगर असलेल्या नदीत वाघ सिंह सुद्धा पाणी प्यायला घाबरतात.
पण काही माणसं अशी असतात जी या मगरींना सुद्धा घाबरत नाहीत. अशाच मंडळींपैकी एक तरुण सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तुम्हाला पाहून कदाचित शॉकच बसेल कारण हा तरुण चक्क मगरीच्या पाठीवर बसून बाईक चालवतोय.