हृदयद्रावक : कोणी एवढे निर्दयी कसे असू शकते ? 1 महिन्याच्या बाळासोबत पहा आई वडिलांनी हे काय केले
आजकालच्या जमान्यात कोणी एवढे निर्दयी होऊ शकते का ? तर हो अशीच एक घटना जळगाव मध्ये घडली आहे. तर याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेऊ.
छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपूल तयार होवून नागरीकांसाठी खूला केला आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ अंदाजे एका महिन्यच्या बाळाचा मृतदेह याठिकाणी आढळून आला आहे. ही बातमी शिवाजी नगर परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी, पोलीस नाईक ललीत भदाणे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून पंचनामा केला. जळगाव शहर पोलीसांनी या बाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, बालकाच्या मृतदेहाजवळ कपडे, औषधी, काळा दोरा, दूध पिण्याची बाटली अशा वस्तू आढळून आल्या आहेत. दरम्यान, बालकाचा मृत्यू कसा झाला? हे बाळ कोण सोडून गेलं होतं, त्याचे पालक कोण? याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.
अस १ महिन्याच्या बाळाला उघड्यावर टाकून देऊन पळून जाने इथपर्यंत निदर्यी आई वडील कसे असू शकतात. अतिशय क्रूर अशी घटना घडलेली आहे. जर आपल्याकडून अश्या लहान बाळाचे संगोपंच होणार नसेल तर आपण त्या बाळाला जन्मच का देतो ? उगाच का त्याला या जगात आणतो आणि नंतर असे रस्त्यावर अनु सोडून देतो. असा प्रश निर्माण होत आहे.