आय रिअली सॉरी मम्मी-पप्पा दीदी, दादा. सॉरी…! असं म्हणत तिने उचलले टोकाचे पाऊल.
श्रीगोंद्यात धक्कादायाक घटना घडली,तिचं त्याच्यावरती प्रेम होतं मात्र त्यानं तिला दगा फटका केला की त्याच्यावरती प्रेम करत राहिली मात्र त्याला दुसरी मुलगी आवडली आणि त्यामुळे तिला हे सहन झालं नाही आणि तिने टोकाचा निर्णय घेतला आपल्या प्रियकरानं दुसऱ्या मुलीवरती प्रेम केलं या यात ना तिला सहन होत नव्हत्या आणि म्हणून तिने जीव देण्याचा निर्णय घेतला घरातील मंडळी औषध उपचारासाठी बाहेर गेल्यानंतर तिने सायंकाळच्या सुमारास घरातील स्लॅबला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मनापूर्वी या मुलीच्या टी-शर्ट मध्ये इंग्रजी मध्ये तिने सर्व प्रकार लिहला होता,
त्यात पाहिल्यानंतर मुलीने मी आज माझा जीव देते… कारण माझं करण खुदांडे वर प्रेम होतं.. त्याचं पण आधी माझ्यावर प्रेम होतं.. पण ते फार्मसीसाठी पुण्याला गेले.. कॉलेजला आणि तिथं जाऊन आता ते दुसऱ्या मुली सोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.. ही गोष्ट मी कधीच सहन नाही करू शकत… वगैरे मजकूर लिहीत शेवटी माझं आयुष्याचं वाटोळं केलं.. खूप त्रास होतोय.. म्हणून, मी जीव देते.. आय रियली सॉरी मम्मी, पप्पा, दीदी, दादा.. सॉरी मी तुम्हाला सोडून चालले… प्लीज मला माफ करा.. माझ्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप आहे.. त्यामध्ये सगळी माहिती आहे..
प्रमाणे मजकूर लिहिलेली चिठ्ठी नमूद मुलीच्या टी-शर्ट मध्ये मिळाली.वय वर्ष 17 असलेल्या मुलीसोबत करण कुदांडे याने प्रेम संबंध निर्माण करून, तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न करून, त्यानंतर च्या काळात पुणे येथे दुसऱ्या कोणत्यातरी..? मुलीशी प्रेम संबंध निर्माण करून, माझ्या मुलीस मानसिक त्रास दिल्याने..!
त्या त्रासाला कंटाळून मुलीने दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी चे सायंकाळी 5:30 वाजता चे पूर्वी राहते घरी स्लॅबचे हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून करण कूदांडे याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने मयत मुलीच्या वडिलांनी त्याचे विरोधात भादवि कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे