किरकोळ वाद डोक्यात ठेवून त्या दोन भावांनी ठेकेदारासोबत केलं अस काही, पहा बातमी सविस्तर.
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील हसाराटोली परिसरात रात्रीच्या सुमारास खुनाची घटना घडली.या प्रकरणी तुमसर पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. विजय श्रीराम नखातेअसे मृताचे नाव आहे. तर गणेश बरेकर व कृष्णा बरेकरहसाराटोली ( दोघे रा. हसाराटोली ) अशी आरोपी भावांची नावे आहेत.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपींचे दोन दिवसापूर्वी भांडण झाले होते. तुमसर शहराला लागूनच असलेली हसाराटोली येथे शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान स्थानिक बौद्ध विहार जवळ विजयच्या हत्येचा थरार घडला. घटना घडताच परिसरात स्मशान शांतता पसरली होती घटनेची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतक विजय व जवळच हत्येत वापरण्यात आलेले हत्यार आढळून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा बांधकामाचे खाजगी ठेके घेऊन काम करणारा होता. त्यात विजयच्या परिचयाच्या आरोपी कृष्णा व गणेश यांचे कामाच्या ठिकाणी घटनेच्या दोन दिवसा पूर्वी शुल्लक कारणावरू वाद झाला होता. तेच शाब्दिक वाद विकोप्याला जाऊन सदर हत्येचे थरार घडल्याची माहिती मृतकाच्या लहान भावाने व मुलाने पोलिसांना दिली
या हत्येची नोंद घेऊन दोन्ही आरोपी भावांना अटक केली आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.