नाद केला आणि….खेकड्यासोबत खेळने तरुणाला पडले महाग परत चुकूनही नाद करणार नाही.
अनेकांना प्राण्यांशी खेळायची सवय असते, पण प्राण्यांनाही मन असतं या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि प्राण्याना त्रास दिला तर त्यांनाही राग येतो हे लक्षात असायला पाहिजे, आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही राग येऊ शकतो. मग ते चांगलाच इंगा दाखवत सर्वशक्तीनिशी समोरच्याला धडा शिकवतात.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण खेकड्याला हातात पकडून त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं खेकड्याला अगदी त्याच्या तोंडासमोर आणलं आहे. खेकड्याची एक नांगी पकडून त्याच्यासोबत खेळत आहे. ते खेकड्याच्या नांग्यामध्ये जीभ टाकयचा आण बाहेर काढायचा. मात्र हे सगळं खेकड्याला आवडलेलं दिसत नाही.
दरम्यान खेकडा अचानक त्या तरुणाची जीभ आपल्या नांग्यांनी पकडतो. यानंतर त्या व्यक्तीला प्रचंड वेदना होत असून तो मोठ मोठ्यानं ओरडायला लागतो आणि खेकड्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतो. मात्र खेकडा काही त्याची जीभ सोडत नाही.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी धक्का बसला आहे. अशा प्रकारे प्राण्यांशी खेळणे कसे अंगलच येऊ शकते हे या व्हिडीओवरुन कळते. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज गेले आहेत. तर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत. दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते.