दुरगाव मध्ये आषाढी एकादशीदिनी कुर्बानी नाही शांताता बैठकीत निर्णय.
तालुक्यातिल दुरगाव मध्ये आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने गावातील मुस्लीम समाजाने या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय घेतला असून दुसर्या दिवसी कुर्बानी करणार आहोत तसेच गावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक व एकात्मतेचे दर्शन घडवून समाजापुढे एक चांगला आदर्श घातला आहे.
आषाढी एकादशी व बकरी ईद गुरुवारी (दि. २९) आहे. विठ्ठलाची आणि आषाढीची प्रत्येकाला आतुरता लागून आहे. बकरी ईद आणि आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. या सणांच्या पार्श्वभूमीवर दुरगाव मध्ये ग्रामस्थ यांच्या माध्यमातून दुरगाव येथील मशिदी मध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत दुरगावातील मुस्लीम समाजाने या दिवशी कुर्बानी देणार नसल्याचा निर्णय घेतला निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे. कर्जत येथिल दुरगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. तर हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखले जात आहे. दुरगाव तालुक्यात आणि जिल्हात विटांनचे गाव म्हणुन प्रसिद्ध आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही छोट्या-मोठ्या घटनांचे रूपांतर मोठ्या घटनांमध्ये होऊ नये म्हणून डि.वाय.एस.पी वाखारे साहेब आणी पि.आय पाटील साहेब पी.एस.आय सालघूडे साहेब सहकारी कोक आणी बेग यांनी दुरगाव येथे येऊन शांतता बैठक घेऊन आव्हान केले पोलिसांच्या वतीने नेहमीच खबरदारी घेतली जाते.
यावेळी मुस्लीम ग्रामस्थांनी एकत्र बैठक घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला यावेळी उपसरपंच पप्पु शेख , युवक नेते फिरोजभई मोगल , तालुकाध्यक्ष बसपा कर्जत आल्ताफभाई शेख , कादर मोगल, शफिक शेख आप्सार शेख , रमजानभई शेख काजुभाई शेख , शाहिद शेख,फरिद मोगल शब्बिर शेख मोसिम शेख इत्यादी सह मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.