विना आमंत्रण लग्नात जेवायला गेलेल्या व्यक्तीसोबत लग्नातील वराडीमंडळीनी पहा काय केले.
काही घटना एकूण आपल्याला संताप येतो. काही लोकांना आमंत्रणाशिवाय लग्नाला जायची हाऊस असते.
एखाद्या अनोळखी ठिकाणी एखाद्या अनोळख्या लग्नात अचानकपणे जाऊन भेट देणे एखाद्याला किती महाग पडू शकते
याचा प्रत्यय बातमीमध्ये येणार आहे.
एकजण आमंत्रण शिवाय एका लग्नात जेवण्यासाठी पोहोचला आणि आमंत्रण न देताच जेवणासाठी आला म्हणून त्या लग्नातील लोकांनी त्याला मारहाण केली आहे. या घटनेमध्ये त्या व्यक्तीला काठ्या आणि रॉडने मारहाण करण्यात आली आहे. ” तू आमंत्रणाशिवाय कस काय लग्नाला आला ? तुला कोणी आमंत्रण दिले ?” असं म्हणत त्याच्यासोबत लग्नातील मंडळीनी वाद घातला. कौशल मुखिया अशा या व्यक्तीचे नाव असून हा एका लग्नात आमंत्रण नसतानाच गेला आणि त्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे.
मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार या लग्नातील टेन्ट ( मंडप ) वाले त्या कौशलच्या ओळखीचे होते. त्यांना
भेटण्यासाठी अनेकदा कौशील लग्नामध्ये किंवा पार्टीमध्ये जात होता. कौशल आपल्या कुटुंबीयांसोबत दिल्लीच्या
सरिता विहार या ठिकाणी राहत होता. शुक्रवारी रात्री आकाराच्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडला यानंतर
पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या लग्नाच्या हॉलमध्ये जाऊन पोहोचला.
या ठिकाणी पोहोचल्यानंतर वरातीतील लोकांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. आणि यात असं समजलं की, आमंत्रण न मिळतात हा लग्नामध्ये पोहोचला आहे याच कारणावरून कौशल्य आणि लोकांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर कौशलला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर झालेल्या कौशलला इथून बाहेर काढण्यात आलं. घटनेनंतर दोन तरुण कौशलच्या घरी पोहोचले आणि याबाबतची माहिती दिली.
कौशल याला रुग्णालयामध्ये दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. कसल्याही प्रकारची शहानिशा न करता या लग्नामधील मंडळींनी या व्यक्तीसोबत जे काही केलं त्यामुळे हा या व्यक्तीचा प्राण गेला आहे. या लग्नातील मंडपवाल्यासोबत या व्यक्तीची ओळख होती आणि त्याला भेटायला गेला म्हणून या लोकांसोबत वाद होऊन त्याचा शेवट हा असा मृत्यूपर्यंत झाला.