” तू लग्नाला नाही म्हणतो ना ? थांब तुला दाखवतेच ” असे म्हणत ती लोकल ट्रेन समोरच जाऊन थांबली आणि…
प्रेम हे असतं प्रेम असत, प्रेम मिळवण्यासाठी सर्वजण काही न काही करत असतात. हेच प्रेम मिळवण्यासाठी एका तरुणीने असाच एक धक्कादायक प्रकार केला. या तरुणीने चक्क जीव देण्याचा प्रयत्न केला. या तरूणीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे प्लॅटफॉर्म क्रमांक ०१ वर समोरून गाडी येत आहे हे पाहताच ती तरूणी गाडीच्या समोर जाऊन उभी राहिली. ही तरुणी दादर मधील रहिवासी असल्याचं समजतय, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
कारण प्रियकर आणि तिच्यामध्ये वाद झाले होते. वाद होण्याचे कारण लग्न होतं. लग्न करण्याच्या मुद्यावर दोघांमध्ये वाद झाला होता. मित्र लग्न करायला तयार होत नसल्यानं तिनं आत्महत्या करण्याचा हा प्रयत्न केला. तर मित्राने सांगितल की, मी लग्नाला तयार आहे, तरुणीच्या मागणीप्रमाणे लगेच लग्न होऊ नाही शकत, काही दिवसांमध्ये लग्न करण्यास तयार असल्याचे तो म्हणाला. भायखळा येथील आरपीएफ आणि अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणी आणि तिच्या मित्रांचं मार्गदर्शन केलं. आता दोघांनाही आपापल्या घरी जाण्याचा सांगितला.
हा सगळा प्रकार नेमका काय घडला यावर एक नजर टाकूया, एक 22 वर्षीय तरुणी भायखळा रेल्वे स्टेशन वर दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न करते. मध्य रेल्वेच्या लोकल मोटरमन आणि आरपीएफ जवान यांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणीचा जीव वाचला. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. तरूणींना भायखळा रेल्वे स्थानकात लोकल रेल्वेच्या ट्रॅक वर उभी राहून दोन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला. सदरील मुलगी कुर्ला कडे जाणाऱ्या लाईनवर उभी होती मोटरमन आणि आरपीएफ जवान यांच्या सतर्कतेमुळे या मुलीचा जीव वाचला.
सायंकाळी ०५:४५ मिनिटांनी कुर्ला कडे जाणाऱ्या धीम्या गतीचा ट्रक वरती मॅडम आल्या होत्या आणि याच वेळी या ठिकाणी आरपीएफ जवान आणि मोटर मन याचं लक्ष गेलं त्यांनी या मुलीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. इथे उपस्थित असणाऱ्या इतर प्रवाशांनी तिला रूळावरून बाजूला होण्यास भाग पाडलं. याच वेळी समोरून येणाऱ्या लोकलच्या मोटरमनला इशारा करून लोकल थांबवण्यास सांगितला. त्या तरुणीला प्लॉट फॉर्म वरती आणण्यात आला आणि सर्व प्रकार हा तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी सांगितला. तो लग्नाला नाही म्हणतो म्हणून या तरुणीनं रेल्वे समोर जीव द्यायचं ठरवलं होत. प्रेमात इतका टोकाचं पाऊल उचलणं हे अत्यंत चुकीचा आहे. भांडणातून काही ना काही तडजोडीचा मार्ग निघत असतो. मात्र आयुष्य पुन्हा पुन्हा नसतं हा विचार करणं फार महत्त्वाचा आहे.