नवरात्रीच्या गरब्यादरम्यान धक्कादायक घटना, या तरुणांसोबत पहा काय घडले.
शारदीय नवरात्र महोत्सव सुरू झाली आहे. दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.सर्वत्र भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली जाते . नवरात्रीच्या निमित्ताने गरबा खेळताना एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत गरबा खेळून झाल्यावर घरी जाताना दुसऱ्या व्यक्तीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला
सध्या नवरात्रीचा उत्सव सगळीकडे जोरात सुरू आहे. मात्र, यातच दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना ही वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील आहे.गोपाल इन्नानी आणि सुशिल काळे अशी या दोन मृतांची नावे आहेत. येथील गोपाल इन्नानी रात्री महेश भवन येथे गरबा खेळत होते. मात्र, याचदरम्यान, गरबा खेळताना ते अचानक पडले आणि क्षणार्धात त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यासारखीच आणखी एक दुर्घटना कारंजा लाड शहराच्या शांतीनगर येथील सुशील काळेसोबत घडली. गरबा नृत्यात सहभागी झाला होता. यानंतर गरबा खेळून ते घरी पोहोचले. सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. मात्र, डॉक्टरजवळ जाण्याआधीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाला. मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह इथे भाजपतर्फे आयोजित प्रेरणा रासमध्ये ही घटना घडली. ऋषभ लहरी मंगे भानुशाली असं मृत 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीचा रहिवासी होता. बोरिवलीतील एका खासगी कंपनीत ऋषभ कामाला होता.
नवरात्री उत्सवात अश्या दुखद घटनाच प्रमाण वाढल आहे , आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण महत्वाच आहे .